Ticker

6/recent/ticker-posts

पोंभुर्णा पोलीस ठाण्याचे शिपाई विशाल खडके यांचा अपघातात मृत्यू




पोंभुर्णा: उपविभागीय कार्यालयात डाक देऊन परत जातांना एका पोलिस शिपायाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना काल घडली. विशाल गणपत खडके (४२) रा. चंद्रपूर असे मृतक पोलिस शिपायाचे नाव आहे. ते पोंभूर्णा पोलिस स्टेशन येथे कर्तव्यावर होते.

पोलिस स्टेशन पोंभूर्णा येथील पोलिस शिपाई डाक घेऊन मूल येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात गेला होता. डाक देऊन दुचाकीने परत जात असताना त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला.यात त्यांचा मृत्यू झाला. 
     ही घटना काल शुक्रवारी सायंकाळी  6 वाजताच्या दरम्यान चिरोली गावानजीकच्या पुलासमोरील वळणावर घडली. यात गंभीर दुखापत होऊन शिपाई चा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments