Ticker

6/recent/ticker-posts

चारचाकी कार झाडाला आदडल्याने पती ठार पत्नी जखमी : चिधिमाल जवळील घटना



अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी

नागभीड ----नागभिड पोलीस स्टेशन अतंर्गत येत असलेल्या चिंधिमाल फाट्यावर चंद्रपूर कडून नागपूर कडे जात असलेली गाडी क्र.एम.एच.४०,एक्स.सी.३०८३ या डस्टंर चारचाकी वाहनाने झाडाला जोरदार धडक दिल्याने ड्रग इनेस्पेकटर चद्रमनी डांगे नागपूर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी गंभिर जखमी असल्याचे समजते.
    नागपूर येथे ड्रग इनेस्पेक्टर असलेले डांगे हे पत्नी मुलगी याचेसोबत चंद्रपूर येथुन नागपूर येथे जात असताना नागभिड पोलीस स्टेशन अतंर्गत येत असलेल्या चिंधिमाल जवळील रस्त्यालगत असलेल्या झाडाला जोरदार धडक दिली. त्यात गाडी चकनाचूर झाली. लगेच जखमीना ताबडतोब दवाखान्यात दाखल करण्यात आले.मात्र चंद्रमनी डागे (वय ५०वर्ष ) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर पत्नी गंभिर जखमी असुन उपचार सुरू आहे. घटनेची माहिती नागभिड पोलिसांना मिळाली असुन अधिक तपास नागभीड पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments