Ticker

6/recent/ticker-posts

एसटी बसच्या सीटा तुटलेल्या, खिडक्या मोडलेल्या मात्र शासनाची जाहिरात चमकदार! एसटी बसला दुरुस्त करण्यासाठी सरकारकडे पैसा नाही, मात्र 50 करोड रुपयांच्या जाहिराती वर केला खर्च

एसटी बसच्या सीटा तुटलेल्या, खिडक्या मोडलेल्या मात्र शासनाची जाहिरात चमकदार!


एसटी बसला दुरुस्त करण्यासाठी सरकारकडे पैसा नाही, मात्र 50 करोड
रुपयांच्या जाहिराती वर केला खर्च

जीवनदास गेडाम, (विशेष प्रतिनिधी)

मोडक्या, तुटक्या एसटीवर सीटा तुटून पडलेल्या असताना प्रवाशांना अशा खिळखिळ्या झालेल्या आजारी बसवर प्रवाशांना नाईलाजाने प्रवास करावा लागत आहे. मोडक्या तुडक्या बसांची दुरुस्ती करण्याऐवजी प्रसिद्धीसाठी सरकार जनतेच्या पैशाची उधळपट्टी करत आहे. आणि आश्चर्याची बाब म्हणजे याच तुटक्या तुटक्या बसवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची जाहिरात चमकताना दिसते, हे या देशाचे दुर्दैवच म्हणावे लागेल.


एसटीवर चिकटवण्यात आलेल्या जाहिरातींवर 50 कोटीहून अधिक खर्च करण्यात आला आहे. राज्य शासन एसटी चे कोट्यावधी रुपये खर्च करून उधळपट्टी करत आहे.

https://youtu.be/aQz3SdeTzi0https://youtu.be/aQz3SdeTzi0

 दिनांक 18  जून रोजी जुनगावला आलेल्या बसची अवस्था पाहून प्रवाशांच्याही डोळ्यात पाणी आले असावे. पोंभुर्णा ते जुनगाव ही बस सेवा सुरू आहे.या बसमध्ये प्रवाशांना बसण्यासाठी असलेल्या आसनांची अवस्था गंभीर होती. अनेक आसन तुटून पडलेली होती. अशी गंभीर अवस्था एसटी बसची ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे. अत्यंत आजारी असलेल्या बसेस ग्रामीण भागात पाठवल्या जात असल्याने ग्रामीण भागात नागरिक राहतात की जनावरे असा प्रश्न आता ग्रामीण जनता करू लागली आहे.

Post a Comment

0 Comments