वादळी वाऱ्यामुळे चेक ठाणेवासना येथील जल शुद्धीकरण संयंत्राचे मोठे नुकसान
आरो प्लांट वरील पत्रे उडाली, पाणीपुरवठा खंडित
पोंभुर्णा: प्रतिनिधी
9 जुन रोजी आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे व पावसामुळे जिल्ह्यात कहर माजवला होता. अनेक तालुके या वादळाचे शिकार झाले. अनेकांच्या घरांची पडझड झाली, तर अनेक जण उघड्यावर आले.
पोंभुर्णा तालुक्यातील चेक ठाणेवासना येथील डी एफ यु प्लांटचे संपूर्ण पत्रे उडून गेली आणि जल शुद्धीकरण संयंत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे जनशुद्धीकरण सयंत्र बंद पडून असल्याने शुद्ध पाण्यासाठी लोकांची भटकंती सुरू आहे. संबंधित विभागाने लक्ष केंद्रित करून सदर आरो प्लांट पूर्ववत सुरू करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading