Ticker

6/recent/ticker-posts

आज पोंभुर्णा येथे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेची महत्त्वपूर्ण बैठक



आज पोंभुर्णा येथे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेची महत्त्वपूर्ण बैठक

पोंभुर्णा: अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली जिल्हा शाखा चंद्रपूर च्या वतीने आज दि.27 जुन 2023 रोजी सकाळी 11 वाजता विर बाबुराव शेडमाके सामाजिक सभागृह पोंभुर्णा येथे महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीत विविध विषयावर चर्चा केली जाणार आहे. या बैठकीला आदिवासी सेवक, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे प्रदेश सचिव केशवराव तिरानीक, महिला प्रदेश संघटिका सुनीताताई मरस्कोल्हे, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष जनार्दन गेडाम, जिल्हा महासचिव परशुरामजी उईके, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ. गीताताई सलामे, चंद्रपूर महानगर अध्यक्ष शशिकांत मोकासे, महानगर महासचिव अरविंद जी परचाके, सिंदेवाही तालुका अध्यक्ष पुष्पाताई सिडाम, अशोक मेश्राम इत्यादी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

तालुक्यातील आदिवासी समाजातील महिला, पुरुष व तरुणांनी मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित राहून मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन बैठकीचे संयोजक,अर्जुनी मोरगावचे सरपंच जगदीश सेमले यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments