नागरिकांना कोणत्याही पोलिस ठाण्याचे फोटो, व्हिडिओ काढता येणार
नागपूर: आता कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही पोलीस ठाण्याचे आतील व बाहेरील फोटो व्हिडिओ काढता येणार आहे.या संबंधीचे आदेश पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले आहेत.
पोलिस स्टेशन ही "लिगल पब्लिक प्लेस" आहे, आणि पोलिस पब्लिक सर्वंट आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे फोटो किंवा व्हिडिओ काढण्याचा सर्वसामान्य जनतेला अधिकार आहे. त्याला कोणतेही पोलीस अधिकारी व कर्मचारी अडकाठी आणू शकत नाही.
कामात पारदर्शकता आणण्याचा दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे. रस्त्यावर ड्युटी बजावत असलेल्या पोलिसांचेही फोटो किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचा अधिकार सर्वसामान्य नागरिकाला आहे, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटले आहे.
0 Comments