पोंभुर्णा : प्रतिनिधी
शेतकऱ्यांवरील संकट काही करता कमी होईना. जुलै महिना संपत आला तरी दमदार पावसाची हजेरी न लागल्यामुळे धान रोवणी व अन्य शेतीची कामे खोळंबलेली आहेत. त्यामुळे शेतकरी राजा चिंतेत पडला आहे.
जुडवा जुडव करून शेतकरी राजाणे कापसाची व धानाची पेरणी केली. मात्र पावसा अभावी काहींची पिकेच उगवली नाही तर काहींना बोगस बियाणे विकणाऱ्यांनी फसवलं. बोगस बियाणे उगवलेच नाही. शेतकऱ्यांना लुबाडणारी व फसवणूक करणारी मंडळी सर्वत्र आहेच आहे. मात्र या समस्येतून सुटका करण्यासाठी कोणतीच यंत्रणा शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे नसल्याचे चित्र आहे.
0 Comments