पोंभुर्णा: तालुक्यातील जुनगाव येथील शेतकरी व गाव कोतवाल श्री गंगाधर गुलाबराव मेश्राम (वय ५८ वर्ष) यांना चार दिवसापूर्वी सर्पदंश झाला होता. त्यांना ताबडतोब उपचाराकरिता गोंडपिपरी येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते.
उपचार करून ते सुखरूप घरी पोहोचले असल्याने कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे. सध्या शेतीचे व पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी .साप ,विंचू इत्यादी श्वापदापासून आपले रक्षण करावे यानिमित्ताने हेच सांगावेसे वाटते.
0 Comments