Ticker

6/recent/ticker-posts

सोमय्याची बातमी दाखवणाऱ्या वाहिनीचे प्रक्षेपण बंद पाडले💥 लोकशाहीची क्रूर थट्टा! सत्य दाखवण्याचा आवाज बंद पाडण्याचा डाव

सोमय्याची बातमी दाखवणाऱ्या वाहिनीचे प्रक्षेपण बंद पाडले💥


लोकशाहीची क्रूर थट्टा! सत्य दाखवण्याचा आवाज बंद पाडण्याचा डाव

दरारा 24 न्यूज 
ईडीच्या आरोपाने अनेकांचे आयुष्य उध्वस्त करणारा भाजपचा माजी खासदार किरीट सोमय्याच्या सेक्सकांडचा अखेर पर्दाफाश झालाच. पण हे प्रकरण उजेडात येऊ नये तसेच यानंतर जनआंदोलन होऊ नये यासाठी काही यंत्रणा अजुनही धडपडताना दिसत आहेत. हे या राज्यसरकार आणि प्रशासकीय यंत्रणेच्या पाठिंब्या शिवाय शक्य नसल्याचेही यानिमित्ताने स्पष्ट होत आहे. कोल्हापूरातील लोकशाही न्यूज चॅनेलच बंद करण्यात आले आहे. शिवसेनेला पोलिसांकडून आज आंदोलन करण्यासही पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली आहे.


उठ-सुठ विरोधकांवर भ्रष्टाचाराचा आरोप करुन, ईडी कारवाईचे स्टंट किरीट सोमय्या याने केल्याचे आजपर्यंत दिसून आले. आरोप झालेल्यांपैकी आज अनेक जण भाजपसोबत सत्तेत असल्याचे दिसून येत आहेत. त्यानंतर त्यांची चौकशी बंद झाल्याने पिढीसारख्या केंद्रीय तपास यंत्रणेचा सोमय्या याच्याकडून गैरवापर केल्याचे स्पष्ट दिसून आले आहे. त्यात विक्रांत पाणबुडी वाचविण्यासाठी गोळा केलेल्या आणि गायब केलेल्या निधीबाबत सोमय्या याच्यावर तक्रार करून सुद्धा आणि पुरावे देऊन सुद्धा त्याला बाजूला करण्यात आल्याने, सोमैयाच्या पाठीशी भाजपची कोणती यंत्रणा कार्यरत आहे हे यापूर्वीच जाहीर झाले आहे.

सध्या एकनाथ शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीचा गटही भाजपबरोबर सत्तेत आला आहे. त्यामुळे यापुर्वी विरोधकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे सोमैया आता काय करणार यामुळे निशाण्यावर असताना ,आता तर सोमय्याच्या सेक्सकांडचाच पर्दाफाश झाल्याने,भाजपच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहे. लोकशाही न्यूज या वृत्तवाहिनीने काल सोमवारी रात्री सोमैयाच्या अशा विकृत क्लिप ची माहिती उजेड आणून खळबळ उडवून दिली.

यासंदर्भात काल या वृत्तवाहिनीने संध्याकाळी देशभरातील खळबळजनक वृत्त प्रसारित करणार असल्याचे जाहीर केले होते. पण भाजपशी संबंधित स्थानिक केबल चालकाकडून कोल्हापुरातील लोकशाही न्यूज चॅनलच काल सायंकाळ पासून बंद ठेवण्यात आल्याचा प्रकार समोर आला. तर आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने,महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या सोमय्यावर कडक कारवाई करावी या मागणीसाठी निदर्शनासह आंदोलन करण्यात येणार होते.पण पोलिसांनी ऐनवेळी या आंदोलनास परवानगी नाकारल्याने, पोलिसांवर यासाठी दबाव असल्याचे चित्र दिसून येत आहे. आज जरी पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी भाजपच्या या लफंगा सोमय्या विरोधात उद्या आंदोलन करणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments