👉 जनतेच्या समस्या जाणून शासनाकडे करणार पाठपुरावा.
गडचिरोली (प्रतिनिधी)
सैनिक समाज पार्टीचे वतीने गडचिरोली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या , अडचणी जाणून घेण्यासाठी आणि त्या समस्यांचे संविधानिक मार्गाने रितसर निवारण व्हावे त्यासाठी शासन दरबारी पाठवुन पाठपुरावा करण्यात येणार आहे तसेच आगामी ग्रामपंचायत नगरपरिषद , नगर पंचायत , विधानसभा, विधान परिषद,लोकसभा निवडणूकीसाठी संभाव्य उमेदवारांची निवड यादी तयार करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. याबरोबरच देशातील महिलांवरील होणारे अन्याय - अत्याचार , शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि कारणीभूत घटक ,वाढती बेरोजगारी , वनजमीनीचे पट्टे, जिल्ह्यातील शैक्षणिक तसेच आरोग्य विषयक समस्या, परिवहन , शहरातील आणि दुर्गम भागातील विविध प्रकारच्या समस्या,पेंशन, शासनाने निर्गमित केलेले चुकीचे धोरण ,व्यवसाय आणि बॅकेचे धोरण याबरोबरच विविध प्रकारच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी दिनांक ३० जुलै २०२३ रोजी दुपारी २ वाजता गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकातील विश्राम भवन येथे बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. तरी सैनिक समाज पार्टीच्या सर्व सभासद, पदाधिकारी आणि कामगार, कंत्राटी कर्मचारी, युवक - युवतींनी आपल्या समस्यांचे लेखी निवेदन घेऊन उपस्थित राहावे असे आवाहन सैनिक समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष चक्रधर मेश्राम, महासचिव प्रकाशसिंग बंडवाल यांनी केलेले आहे.
0 Comments