जुनगाव जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा
सरपंच उपसरपंच व मान्यवरांची उपस्थिती, विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट भाषणे केली
पोंभुर्णा: तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या जुनगाव येथील जिल्हा परिषद शाळेत भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावातून रॅली काढून भारत माता की जय, अशा अनेक गगनभेदी घोषणा देत प्रभात फेरी काढली.
सर्वप्रथम रॅली गावातील ग्रामपंचायत भावना समोर आल्यानंतर तिथे ग्रामपंचायत कार्यालयाचा ध्वज फडकविण्यात आला. सरपंच पूनम ताई राहुल चुधरी यांनी ग्रामपंचायत कार्यालयातील ध्वज फडकवला.
त्यानंतर शाळा पटांगणात "मेरी माटी मेरा देश" या अभियाना अंतर्गत शीला फलकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी सरपंच पुनम ताई चुधरी, उपसरपंच व भाजपचे युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष राहुल भाऊ, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा होमिकाताई मशाखेत्री, तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रफुल चुधरी, पत्रकार व माजी सरपंच जीवनदास गेडाम, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष देवराव आभारे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य संजय भोयर, व सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाला गावातील नागरिकांची सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
0 Comments