नऊ वर्षीय विद्यार्थिनीवर नराधमाचा अत्याचार, नराधम अटकेत
==================
विकृत मानसिकता घरा घरातून नष्ट वाव्ही :- अल्का आत्राम
मुल: देशात स्त्री अत्याचार वाढले असून सर्वत्र महिला,विद्यार्थिनी स्वतःला असुरक्षित समजू लागले आहेत. मुल पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या पोंभुर्णा तालुक्यातील जुनगाव येथे शाळेतील उपक्रम दिव्यांग निधी गोळा करताना अल्पवयीन मुलीवर गावातीलच एका नराधमाने घरी बोलावून अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी नराधम नितेश विनाजी नवघडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याचेवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागण सर्व स्तरातून होत आहे.
भाजपच्या नेत्या अलकाताई आत्राम यांनी अत्याचार झालेल्या पीडित कुटुंबातील घरी जाऊन भेट घेतली घडलेली चर्चा केली. ही कृती ही विकृत मानसिकतेचा प्रकार आहे. या असल्या लोकांमुळे आज मुली स्वतःला असुरक्षित समजू लागल्या आहेत.त्यामुळे प्रत्येक समाजातून घरातून असल्या विकृत मानसिकता घालवण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे . असे मत भारतीय जनता पार्टीच्या नेत्या अलकाताई आत्राम यांनी व्यक्त केले आहे. या घटनेचा तपास एस डी पी ओ इंगळे साहेब यांचे कडे आहे.त्यांचेशी चर्चा करून पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले. पोलीसानी अतिशय तात्काळ कार्यवाही करत आरोपीला अटक करून सर्व गुन्हे दाखल केले.
या बाबतीत कठोर कायदे व्हावे जेणेकरून यावर आळा बसेल आणि आरोपीला कठोर कार्यवाही होईल यासाठी निवेदन देण्यात आले. यावेळी अल्का आत्राम प्रदेश महामंत्री महिला मोर्चा, वंदना आगरकठे जिल्हा महामंत्री, रत्नमाला भोयर ओ बी सी आघाडी अध्यक्ष, राहुल पाल उपसरपंच, पांडुरंग पाटील पाल,उषा शेंडे माजी नगराध्यक्ष, अर्चना चावरेअध्यक्ष मूल महिला , वैशाली बोलमवार महिला अध्यक्ष पोंभुर्णा, रजिया कुरेशी सचिव महिला मोर्चा, सुनीता म्यॅकलवार माजी नगरसेविका, कल्पना मेश्राम महामंत्री, शुभांगी पर्यावरण अध्यक्ष, भारती हरमवार उपस्थित होते.
0 Comments