*जि. प. उच्च प्राथमिक शाळा उमरी पोतदार येथे शिक्षण दिन साजरा*
(अजित गेडाम, प्रतिनिधी)
पंचायत समिती पोंभुर्णा अंतर्गत जि. प. उच्च प्राथमिक शाळा, उमरी पोतदार येथे ०५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून 'स्वयंशासन उपक्रमाचे आयोजन' करण्यात आले.
गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात परब्रह्म तस्मैः श्री गुरुवेः नमः।
आपल्या संस्कृतीत आई-वडिलांनंतर दुसरं महत्त्वाचं स्थान असतं ते गुरूला. आई जशी मुलांवर संस्कार करते, तसा गुरु हा मुलांना घडवण्याचे, त्यांना सक्षम करण्याचे काम गुरु करतो. जीवनाला दिशा देण्यात आणि आपली जडणघडण करण्यात गुरुचा वाटा खूप मोठा असतो. त्यामुळे शिक्षक दिनाला भारतीय संस्कृतीत अधिक महत्त्व आहे. भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच, ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशातून विद्यार्थी हे शाळेतील शिक्षकेत्तर कर्मचार्यांच्या भूमिका आजच्या दिवशी पार पाडत असतात.
या कार्यक्रमाला मुख्याध्यापक म्हणून राकेश रामलू कल्लमवार, उपमुख्याध्यापक म्हणून सान्वी कुंभरे तिने तर शिक्षक म्हणून यश मेश्राम, साहम दुधबळे, प्रेम झबाडे, ओम झबाडे, हर्षन तोडासे, दशरथ गेडाम, कार्तिक लेनगुरे, पूर्वी ठाकरे मानसी मडावी, पूर्वी मडावी, श्रावणी ठाकरे, अंश पेंदोर पावनी गेडाम, मीनाक्षी कल्लमवार इत्यादी विद्यार्थ्यांनी भूमिका पार पाडली.
या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन माननीय संजय झोडे सर यांनी तर मार्गदर्शक माननीय अनिरुद्ध कदम सर यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी करिता श्री अरुण कोवे, सुरेश सर, सुशील गव्हारे यांनी सहकार्य केले.
0 टिप्पण्या
Thanks for reading