मुसळधार पावसामुळे घरात साचले पाणी-भास्कर गेडाम यांची रोजचीच कहानी


मुसळधार पावसामुळे घरात साचले पाणी-भास्कर गेडाम यांची रोजचीच कहानी

जुनगाव: कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज दिनांक 21 सप्टेंबर,सकाळपासून जुनगाव येथे मुसळधार पाऊस बरसात आहे. या पावसाचा सर्वात जास्त फटका जुनगाव येथील अत्यंत गरीब असलेल्या भास्कर गेडाम यांच्या झोपडी वजा घरात पावसाचे पाणी साचले असल्याने त्यांची राहण्याची पंचायत निर्माण झाली आहे. पाऊस पडला की हा प्रश्न प्रत्येक वेळेस भेडसावत असतो.


या आदिवासी नागरिकास अजून पर्यंत घरकुलाचा लाभ मिळाला नसल्याने त्यांना झोपडीतच आपले जीवन कंठावे लागत आहे. दुसरीकडे मात्र अनेकांना गरज नसतानाही घरकुलाचा लाभ देण्यात आलेला आहे.मात्र गरजू लोकांना घरकुल योजनेतून डावलण्यात आल्याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. गावातील अनेक गरिबांच्या घराची अशीच अवस्था झाल्याचे सांगण्यात येत आहे.
शीला विश्वनाथ झबाडे या विधवा व निराधार महिलेच्या घराची पडझड झाली असून जिकडून तिकडून पावसाचा प्रहार घरात होत असल्याने या महिलेची तारांबळ उडाली आहे. पुरुषाचा आधार नसल्याने या महिलेवर प्रचंड तान- तणाव निर्माण झाला. अशा लोकांची यादी बनवून ग्रामपंचायतीने प्राधान्य क्रमाने घरकुल मंजूर करावे अशी मागणी करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नांदगावात एकाच रात्रीत नऊ दुकाने फोडली, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

पिंपरी देशपांडे येथिल कापूस वेचणाऱ्या महिलेवर वाघाचा हल्ला

नांदगाव जवळ भीषण अपघात। कंपनीच्या सुपरवायझर चा जागीच मृत्यू