Ticker

6/recent/ticker-posts

प्यारेलाल लाकडे यांना मातृशोक 🔴 कमलाबाई दादाजी लाकडे यांचे वृद्धापकाळाने निधन


प्यारेलाल लाकडे यांना मातृशोक 🔴 कमलाबाई दादाजी लाकडे यांचे वृद्धापकाळाने निधन

अजित गेडाम, (प्रतिनिधी)
जुनगाव: पोंभुर्णा तालुक्यातील जुनगाव येथील बौद्ध समाज कमेटी चे माजी अध्यक्ष प्यारेलाल लाकडे यांच्या मातोश्री कमलाबाई दादाजी लाकडे यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी सायंकाळी पाच वाजता निधन झाले.मृत्यु समयी त्यांचे वय ९६ वर्ष होते.

श्रीमती कमलाबाई दादाजी लाकडे या प्रसिद्ध दाईनबाई म्हणून कार्यरत होत्या. मात्र वयोमानामुळे त्यांनी काही वर्षांपूर्वीच ते काम सोडले होते. त्या गावातील सर्वात वयस्कर महिला म्हणून म्हणता येईल. त्यांचा स्वभाव आधीपासूनच प्रेमळ होता आणि सर्वांसोबत आपुलकीचे नाते होते.

त्यांच्या पश्चात मुलगा प्यारेलाल, सून, दोन मुली, जावई, नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांचेवर उद्या दुपारी बारा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Post a Comment

0 Comments