महिलांची सोशल मीडियावर मागणी आणि प्रतिक्रिया
दरारा 24 तास
महिला आरक्षण बिल सध्या देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. काहीजण महिला आरक्षण देण्याच्या बाजूने आहेत तर काहीजणांच्या भूमिका मवाळ आहेत. हे आपण संपूर्ण देशाने बघितले आहे.
परंतु महिला आरक्षणापेक्षा संरक्षणाची जास्त गरज असल्याचे मत काही स्त्रियांनी व्यक्त केले असून त्यांनी संरक्षणासाठी बंदुकीची मागणी केली आहे. सध्या देशात स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराने स्त्रिया पेटून उठल्या आहेत त्याचाच प्रत्यय सोशल मीडिया वरून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करून व्हायरल होत आहेत.
महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी ठोस कार्यक्रमाची गरज असून नुसते गाजर दाखवण्यात सरकार तल्लीन आहे.यात सुधारणा होणे आवश्यक आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading