वाघाच्या हल्ल्यात ताडाळा येथील शेतकरी ठार, मुल तालुक्यातील घटना
मुल तालुका प्रतिनिधी
मुल पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या व पोंभुर्णा वनपरिक्षेत्रा च्या हद्दीतील ताडाळा शेत शिवारात शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी सात वाजता चे सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून व नव विभागाप्रती संताप व्यक्त केला जात आहे.
सूर्यभान टीकले वय 55 वर्षे असे या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळावर उपस्थित झाले आहेत पुढील तपास सुरू आहे. वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा अशी नागरिकांची आर्त हाक आहे.
0 Comments