===================
पोंभूर्णा:- गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोह प्रकल्पासाठी लोहखनिज उत्खनन व वाहतुकीचे कंत्राट लॉयडस् मेटल अँड एनर्जी लिमिटेड या खाजगी कंपनीला मिळालेले आहे.कंपनी लोहखनिजाची जड वाहतुक केळझरला पोंभूर्णा शहरातील रहदारीच्या मार्गाने रात्रंदिवस भरधाव वेगाने मोठ्या प्रमाणात करीत आहे.सदर रहदारीच्या मार्गाने शाळकरी मुले शाळेत जाण्यासाठी पैदल ये-जा करतात.यावेळी लोहखनिजाचे भरधाव गाड्यांची वाहतूक सुरू राहत असल्याने शाळकरी मुलांना जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागत आहे.भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी शाळेत विद्यार्थी ये - जा करण्याच्या वेळेत सुरजागडच्या गाड्या बंद ठेवण्यात यावे या मागणीसाठी युवा सेना शहर पोंभूर्णा च्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.यावेळी शाळेच्या वेळेत सुरजागडच्या गाड्या बंद न झाल्यास युवासेना शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
पोंभूर्णा शहर हे तालुक्याचे ठिकाण आहे.जनता विद्यालय तथा जनता ज्युनिअर कॉलेज, श्रीकृष्ण सायन्स कॉलेज, चिंतामणी महाविद्यालय, पोंभूर्णा पब्लिक स्कूल,स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल, डायमंड ज्युबली स्कूल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहेत.शाळेमध्ये ये-जा करण्यासाठी विद्यार्थी सकाळी ७ वाजता पासून १२ वाजेपर्यंत व संध्याकाळी ४ वाजता पासून ७ वाजेपर्यंत शहराच्या मुख्य रहदारीच्या मार्गाने शाळकरी मुले ये जा करतात. याचवेळी
पोंभूर्णा शहरातून लोहखनिजांची वाहतुक करणारे जड व भरधाव शेकडो वाहने राजरोसपणे सुरु आहेत.या गाड्यावर कोणाचेही नियंत्रण नाही.त्यामुळे विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात आले आहे.शहरातून सुरजागडचे जडवाहतुक गाड्या शाळेच्या वेळेत बंद ठेवण्यात यावे यासाठी युवासेनेचे शहर प्रमुख महेश श्रीगीरिवार यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.सुरजागड प्रकल्पाचे गाड्या शाळेच्या वेळेत बंद न झाल्यास युवासेनेच्या वतीने आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी निवेदनातून देण्यात आला.
यावेळी अंकुश गव्हारे, संजय गेलकिवार,आकाश गज्जलवार, राकेश मोंगरकर,राकेश श्रिगीरीवार,प्रकाश
कानमपल्लीवार,नोकेश कपाट,
मनिष कोपावार, विशाल निलमवार,विशाल गुरूनुले, विकास गुरुनुले, सुरज कावळे, साहील नैताम, अक्षय मंकिवार, प्राविण सातपुते, प्रफुल गव्हारे, नीकेश देऊरमले यांची उपस्थिती होती.
0 Comments