सार्वजनिक शारदा मंडळ जुनगाव च्या वतीने सोमवार रोजी नागपूर येथील नृत्य कलाकारांचा नृत्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाा उपाध्यक्ष आणि जूनगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच श्रीमान राहुल भाऊ पाल हे करणार असून अध्यक्षस्थानी माजी सरपंच व पत्रकार जीवनदास गेडाम,पुनम ताई उधरी या राहणार आहेत.तर प्रमुख पाहुणे ग्रामपंचायत सदस्य तेजपाल रंगारी, माधुरी झबाडे, सोनी चुधरी, माजी सरपंच जीवनदास गेडाम, पोलीस पाटील कान्होजी भाकरे, विश्वेश्वर जी भाकरे, गजानन येल्पुलवार, हरिचंद्र पाल, इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
रात्री दहा वाजता हा कार्यक्रम सादर होणार असून या कार्यक्रमाचा रसिकांनी आस्वाद घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading