*नागभीड येथे वाल्मिकी जयंती भव्य शोभयात्रा.*
अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
*नागभीड*: नागभीड येथे वाल्मिकी जयंती निमित्ताने ढीवर समाज मित्र मंडळ, महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती महोत्सव समिती,नागभीड, व ढीवर समाज नागभीड, नवखळा, कोथुळना, बोथली यांच्या संयुक्त विद्यमाने शोभयात्रेचे आयोजन करण्यात आले.. सर्वप्रथम रामायण रचीयता महर्षी वाल्मिकी यांच्या फोटो ला गुलाबराव भानारकर, गिरीश नगरे सर,दिलीप भानारकर, नीलकंठ चांदेकर सर, विजय नान्हे यांच्या हस्ते फुलहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.
यांनतर शोभायात्रेत महर्षी वाल्मिकी, धनुर्धर एकलव्य, लवकुश यांच्या झाकी तयार करण्यात आल्या नवखळा व नागभीड येथील मुख्य मार्गांवरून यात्रा काढण्यात आली.. सदर शोभा यात्रेत लेझीम पथक, या सह बहुसंख्या समाज समाज बांधव सहभागी झाले होते.. या शोभा यात्रेला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश भाऊ वारजूरकर यांनी भेट दिली व ढिवर समाजाच्या या आनंद उत्सवात ते सहभागी झाले.. सदर यात्रेला मार्गदर्शक म्हणून होमदेवजी मेश्राम सर,नागोरावजी नान्हे सर,मधुकरजी डहारे, विलासजी दिघोरे,गजानन मारभते,नागोजी भानारकर,दिनकर डोंगरवार,प्रकाश भानारकर,प्रमोद नान्हे,पराग भानारकर,हिवराज दिघोरे,मोरेश्वर शेंडे सर,दादाजी नान्हे,अजय दिघोरे,सुरेश भानारकर,दिलीप भानारकर,आशिष भानारकर,महीपाल मांढरे, विनोद डहारे सर यांची उपस्थिती होती.
सदर शोभयात्रा यशस्वी होण्यासाठी श्री.महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती महोत्सव समिती चे अध्यक्ष सुनील मांढरे, उपाध्यक्ष राहुल मांढरे,मंगेश नान्हे, कार्याध्यक्ष अमोल मांढरे, सचिव नरेश भानारकर, संजय नान्हे, सहसचिव पंकज मांढरे, कोषाध्यक्ष बळीरामजी भानारकर, प्रफुल वाघमारे, या सह समितीच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.
0 Comments