Ticker

6/recent/ticker-posts

*▪️पोंभुर्णा तालुक्यातील एमआयडीसी चे काम त्वरित सुरू करा* *▪️शिवसेना तालुका प्रमुख पंकज वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार यांना निवेदन* *▪️काम नसल्याने तालुक्यातील बेरोजगार जाताहेत परप्रांतात*



*▪️पोंभुर्णा तालुक्यातील एमआयडीसी चे काम त्वरित सुरू करा*

*▪️शिवसेना तालुका प्रमुख पंकज वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार यांना निवेदन*

*▪️काम नसल्याने तालुक्यातील बेरोजगारांचे परप्रांतात पलायन*

 *पोंभुर्णा/31 डिसेंबर.*
                
गोंडपिपरी तालुक्याचे विभाजन करून स्वतंत्र पोंभुर्णा तालुक्याची निर्मिती युती सरकारच्या काळात १९९९ मध्ये करण्यात आली.आदिवासी व अति मागास तालुका म्हणून पोंभुर्णा तालुका ओळखला जातो.त्यामुळे येथील बेरोजगारीही भक्कम वाढलेली आहे.पोंभुर्णा तालुक्याचा औद्योगिक दृष्टीने विकास व्हावा व तालुक्यातील तरुणांना रोजगार मिळावा यासाठी पोंभुर्णा येथे एमआयडीसी स्थापन करण्यासाठी राज्याचे विद्यमान वने,सांस्कृतिक मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला. यासंदर्भात विधानसभेत जोरकस मागणी केली.आणी त्यांच्या या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले.पोंभुर्णा तालुक्यासाठी स्वतंत्र एमआयडीसी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला.याबाबतची अधिसूचना शासनाच्या उद्योग, उर्जा व कामगार विभागाने प्रसिद्ध केली.


पोंभुर्णा औद्योगिक क्षेत्रासाठी कोसंबी रीठ,चेकहत्तीबोळी,व देवाडा खुर्द येथील १८४.६७ हेक्टर आर खासगी क्षेत्र अधिसूचित करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने शासनाला सादर केला.शासनाने त्यास मंजुरी देऊन अधिसूचना प्रसिद्ध केली.या अधिसूचनेच्या अनुषंगाने महाराष्ट्र औद्योगिक विभाग अधिनियम १९६० अन्वये भुसंपादनाची कार्यवाही करण्याच्या सुचना उद्योग, उर्जा व कामगार विभागाने ६ आगस्त २०१५ च्या पत्रान्वये जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना देण्यात आल्या. त्यानुसार तातडीने सुरुवात करण्यात आली. 


महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)मौजा कोसंबी रीठ ता.पोंभुर्णा जि.चंद्रपूर या करीता खाजगी जमीन असलेल्या ९० खातेदारांची एकुण १०२.५० हेक्टर आर एवढी खाजगी जमिन क्षेत्र भुसंपादण करायची होती खातेदारांना मोबदला देण्याच्या अनुषंगाने अप्पर मुख्य सचिव (उद्योग)तथा अध्यक्ष उच्चाधिकार समिती यांचे अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीने १० लक्ष रुपये प्रति हेक्टरी दराने मंजुरी प्रदान केली होती.

रोजगार मिळेल या आशेवर असलेल्या बेरोजगार युवकांची फार मोठी गच्छंती होत आहे.पोंभुर्णा प्रकल्पात येणाऱ्या उद्योगामुळे रोजगार मिळेल व जिवन मान उंचावेल हि भाबडी आशा महाराष्ट्र औद्योगिक विकास केंद्राचे (एमआयडीसी) काम पुर्णत्वास आल्याने बेरोजगार तरुणांसाठी आनंदाची बाब ठरू शकते.तालुक्यातील बहुसंख्य बेरोजगार कामाच्या शोधासाठी तेलंगणा, आंध्र प्रदेश,इतर राज्यात जाण्याची गरज पडणार नाही.ही तालुक्यातील सर्वात मोठी समस्या असल्याने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख पंकज वडेट्टीवार यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. 🔅
============================

Post a Comment

0 Comments