Ticker

6/recent/ticker-posts

74 करोड रुपयांचा वैनगंगा नदीवरील पूल भूमिपूजनाच्या प्रतीक्षेत



74 करोड रुपयांचा वैनगंगा नदीवरील पूल भूमिपूजनाच्या प्रतीक्षेत

जिवनदास गेडाम, विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर: जिल्ह्यातील शेवटचे टोक असलेल्या जुनगाव येथील वैनगंगा नदीच्या मोठ्या प्रवाहावर 74 कोटी रुपये किंमतीचा पूल मंजूर झाला असून कंत्राटदार कंपनीने आपले निवासस्थान बांधणे सुरू केले आहे. त्यामुळे लवकरच या पुलाच्या बांधकामास सुरुवात होईल अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

पोंभुर्णा तालुक्यातील जुनगाव येथे दोन्ही बाजूने वैनगंगा नदी वाहते, वैनगंगा नदीच्या उपप्रवाहावर मोठ्या पुलाचे बांधकाम सुरू असून ते अंतिम टप्प्यात आले आहे. मोठ्या नदीच्या प्रवाहावर जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे हेवी वेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून दोन्ही नदीवर मोठ्या पुलाच्या निर्मितीस मंजुरी मिळाली आहे. पालकमंत्री यांच्या हस्तेच या पुलाचा भूमिपूजन सोहळा होणार असून मंत्री महोदयांनी लवकरात लवकर भूमी पूजन करून पुलाच्या बांधकामास सुरुवात करावी अशी अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष तथा जूनगावचे सरपंच राहुल भाऊ पाल यांचे या दोन्ही पुलाच्या मंजुरीसाठी मोलाचे योगदान आहे.त्यांनी अनेकदा मंत्री महोदयांच्या दरबारी उंबरठा झीजवून पुल मंजूर करून घेतले. आता राहुल भाऊ पाल यांनी मंत्री महोदयांची तारीख निश्चित करून लवकरात लवकर कामाला सुरुवात करावी अशी घाई नागरिकांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments