Ticker

6/recent/ticker-posts

*आरोग्य शिबिराला चाकलपेठ ग्रामवासियांचा उत्तम प्रतिसाद* - *शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना शिबिरा अंतर्गत स्तुत्य उपक्रम*


*आरोग्य शिबिराला चाकलपेठ ग्रामवासियांचा उत्तम प्रतिसाद*

*शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना शिबिरा अंतर्गत स्तुत्य उपक्रम*
                                                                       
 
         हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ चामोर्शी द्वारा संचालित शरदचंद्र पवार कला महाविद्यालयाचे निवासी शिबिर चाकलपेठ येथे 11 जानेवारी ते 17 जानेवारी या कालावधीत पार पडत आहे. या कार्यक्रमांतर्गत दिनांक 15 जानेवारी 2024 ला शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालय तसेच गण्यारपवार फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला ग्रामस्थांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. या शिबिरात कर्करोग, सिकलसेल, दंतचिकित्सा, या रोगांचा तपासणीचा समावेश होता.
 ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या गोर-गरीब शेतमजूर शेतकरी वर्ग संपूर्ण आयुष्य मोठ्या मेहनतीनं काम करीत आपल्या संसाराचा गाडा चालवीत असताना कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरिता सतत धावपळ सुरू असते, त्यात स्वतः कडे लक्ष देण्यास वेळ नसतो त्यात स्वतःचे आरोग्य ढासळले तरी आरोग्य निदान व उपचार करू शकत नसतो कळतं नकळत अनेक आजाराणे ग्रस्त होत असतो अशा बाबीची जाणीव ठेवीत समस्त ग्रामवसीयांकरिता आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरा करीता गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील कर्करोग विभागाचे तज्ञ डॉक्टराच्या मार्गदर्शनाखाली तपासणी करण्यात आली .
तसेच चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या टीमने सिकलसेल दंत चिकित्सा, नेत्र चिकित्सा व क्षयरोग मधुमेह उच्च रक्तदाब यांचे तपासणी करण्यात येऊन रुग्णांना औषध वाटप करण्यात आले. तत्पूर्वी या रोगांविषयी तज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. डॉक्टर शिल्पा गबने मॅडम यांनी स्त्रियांना होणाऱ्या कर्करोगाविषयी आणि त्यांच्या उपायाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. रवींद्र वासेकर यांनी कर्करोग विषयी गावकऱ्यांशी संवाद साधला. स्नेहा गायकवाड मॅडम यांनी क्षयरोग या विषयावर मार्गदर्शन केलं नागेश मादेशी सर ग्रामीण भागामध्ये होणाऱ्या विविध रोगांविषयी व त्यांच्या लक्षणा विषयी माहिती दिली. मंचावर डॉक्टर आकांक्षा कुंघाडकर, ज्ञानदीप गलबले, शिल्पा रायपुरे, रवींद्र वासेकर, अतिश टेंभुर्णे, डॉक्टर शिल्पा गबने वैद्यकीय अधिकारी(RBSK), डॉक्टर बल्लमवार मॅडम, कुसुम निमसटकर मॅडम, नेहा गायकवाड, नागेश मादेशी, सुषमा कोल्हे आणि पुरुषोत्तम घ्यार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments