Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामपंचायततिला न जुमानता अतिक्रमण करून घराचे बांधकाम, वरिष्ठ अधिकाऱ्यांची ग्रामपंचायतला विचारणा



ग्रामपंचायततिला न जुमानता अतिक्रमण करून घराचे बांधकाम, वरिष्ठ अधिकाऱ्यांची ग्रामपंचायतला विचारणा

चंद्रपूर प्रतिनिधी
मुल तालुक्यातील अत्यंत संवेदनशील म्हणून गणल्या गेलेल्या नांदगाव ग्रामपंचायत कोणाचा वाचक कोणावर नसल्याचे निदर्शनास येत आहे. तत्वतः ग्राम पंचायतीच्या सरपंच पदाधिकाऱ्यांना ग्रामपंचायतीत चालणाऱ्या नियमांची माहितीच नसल्याने असे प्रकार सातत्याने या ग्रामपंचायतीत होत असतात.


ग्रामपंचायत हद्दीत आपल्याला बांधकाम करायचं असल्यास ग्रामपंचायतीचे रीतसर परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र नांदगाव ग्रामपंचायत यात अपवाद ठरत आहे. सखुबाई गंपलवआर यांनी ग्रामपंचायतीच्या जागेत अतिक्रमण करून बांधकाम करीत असल्यामुळे उपसरपंच सागर देऊळकर यांनी कारवाईची मागणी केली आहे.

ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 52 पोट कलम 1 अनुसार घराचे बांधकाम करण्यापूर्वी ग्रामपंचायतीची परवानगी घेणे आवश्यक आहे. परंतु सदर व्यक्ती कसल्याही पद्धतीची परवानगी न घेता मनमर्जीने घराचे बांधकाम करीत आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने ग्रामसेवक तुंबळे यांच्याशी याबाबतीत दूरध्वनीवरून विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर न देता हातझाडले. माननीय तहसीलदार मुल यांनी ग्रामसेवक तुंबडे यांना मोका चौकशी करून अहवाल सादर करण्याचे बजावले आहे मात्र याबाबतीतही ग्रामसेवकांनी बोलण्यास टाळाटाळ केली. यावरून ग्रामसेवक आणि घर बांधकाम करणारे यांच्यात काही तरी गुपित असावे अशी शंका येण्यास भरपूर जागा आहे. याबाबतीत सरपंच हिमाणीताई वाकुडकर यांचेशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 

सदर बांधकाम त्वरित थांबवावे व ग्रामपंचायतीला जुमानणाऱ्या नागरिकांना ग्रामपंचायतीने धडा शिकवावा अशी मागणी खुद्द उपसरपंच सागर भाऊ देउरकर यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments