पोंभुर्णा: मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार संघाच्या वतीने साजरी करण्यात आली. यावेळी पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
पत्रकार भवन येथे आयोजित केलेल्या या पत्रकार दिनानिमित्त सुरज गोरंतवार, रुपेश निमसरकार, जीवनदास गेडाम, सुरेश कोमावार, पंकज वडेट्टीवार, बबन गोरंतवार इत्यादी पत्रकार उपस्थित होते. सर्वप्रथम बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जीवनदास गेडाम, बबन गोरंतवार, सुरज गोरंतवार, रुपेश निमसरकार, पंकज वडेट्टीवार यांनी पत्रकार दिनानिमित्त व पत्रकार दिनाचे महत्त्व विशद केले. पत्रकारांनी एकजुटीने कार्य करण्याची गरज सर्वच वक्त्यांनी व्यक्त केली.
दिवंगत पत्रकार जवाहरलाल धोंडरे यांनाही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जीवनदास गेडाम यांनी तर आभार प्रदर्शन पंकज वडेट्टीवार यांनी केले.
0 Comments