जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांना तीन दिवसापासून आहार बंद
पोंभुर्णा : (अजित गेडाम) पोंभुर्णा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना शालेय पोषण आहार धान्याचा पुरवठा न झाल्याने, काही शाळांत विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचित असल्याची माहिती पुढे आली आहे. हा प्रकार गेल्या तीन दिवसांपासून सुरू असल्याचे विद्यार्थी सांगत आहेत.
शालेय पोषण आहाराचे धान्य आणि इतर साहित्य पुरवठा शाळांना न झाल्याने, तालुक्यातील पहिली ते आठवीमधील हजारो विद्यार्थ्यांचा शालेय पोषण आहार अडचणीत आला आहे. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण 62 शाळा आहेत. यातील सहा शाळांमधील पोषण आहार संपलेला आहे अशी माहिती गटशिक्षणाधिकारी अर्चना मासिरकर यांनी दिली आहे.सध्या अनेक शाळेत साहित्याचा साठा संपला आहे. ज्या शाळेत तांदळाचा साठा संपला आहे. त्या शाळांना तांदूळ,वाटाणा, उसळ, पोषण आहार वाटप करणे अनिवार्य आहे. शाळेतील शिल्लक साहित्य पूर्णत: संपले आहे. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहारापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार व्यवस्थित दिला जातो की नाही, हे पाहण्यासाठी शासनाने वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मात्र, त्यांचे याकडे लक्षच नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. अनेक ठिकाणी तांदळाचा पुरवठा केला गेलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना पोषण आहार देणे कठीण झाले आहे.पुरवठा कंत्राटदार शाळांना तांदूळ व इतर साहित्यांचा पुरवठा करतात.वाटाणा, मटकी यांचा समावेश होतो.
जून महिन्यात जिल्हा परिषदेच्या शाळांना तांदळाचा पुरवठा करण्यात आला होता. दिवाळीपूर्वी काही शाळांत तांदूळ शिल्लक होते. सध्या अनेक शाळेत तांदळाचा व धान्यादी साहित्याचा साठा संपल्याची माहिती मिळत आहे. येथे शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांना पोषण आहाराकरिता स्वत:जवळील रु पये खर्च करण्याचे निर्देश दिले असल्याचे समोर आले आहे. काही शाळांत पोषण आहार देणे सुरू आहे, तर अनेक शाळांत सध्या शालेय पोषण आहार बंद असल्याची माहिती समोर आली आहे.
शिक्षण हक्क कायद्यात शालेय पोषण आहार हा नियमित वाटप बंधनकारक आहे. तो न दिल्यास कारवाईची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कारवाईच्या भीतीने शिक्षक शालेय पोषण आहाराबाबत काही बोलण्यास तयार होत नाहीत.
शालेय पोषण आहारातील धान्य संपल्यामुळे मध्यान्ह भोजनासाठी विद्यार्थ्यांना आपापल्या घराची वाट धरावी लागत आहे किंवा घरून आणलेला डबा खावा लागत आहे.
नियोजन नसल्याने अडचणप्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या पट नोंदणीचे, उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी, विद्यार्थी गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी अनेक वर्षांपासून शालेय पोषण आहाराची योजना सुरू आहे. विद्यार्थ्यांना स्वच्छ वातावरणात पौष्टिक असा सकस आहार देऊन सुदृढ पिढी घडविणे हासुद्धा यामागील एक उद्देश आहे; पण राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाच्या नियोजनशून्यतेमुळे आज शाळांना पोषण आहारापासून वंचित राहावे लागत आहे.
@@@@@@@@@@@@@@@@@@
प्राप्त झालेल्या माहितीनुसार सहा शाळांचा साठा संपला आहे.संपलेल्या धान्यांचा शाळानिहाय आढावा घेत आहोत. येत्या सोमवारी सर्व शाळांना शालेय पोषण आहार वितरित करण्यात येईल.
- *अर्चना माशीरकर,गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती पोंभुर्णा*
0 Comments