Ticker

6/recent/ticker-posts

सरपंच पदी राहुल भाऊ पाल यांची निवड झाल्याने गावात उत्साह


https://youtube.com/shorts/khWHclP9cKU?si=Kc5LqqEU4irYz79z


सरपंच पदी राहुल भाऊ पाल यांची निवड झाल्याने गावात उत्साह
पोंभुर्णा: तालुक्यातील जुनगाव येथील ग्रामपंचायत सरपंच सौ पुनम राहुल चुधरी यांचे वर अविश्वास ठराव पारित झाल्याने सरपंच पद रिक्त झाले.



महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कायद्याच्या तरतुदीप्रमाणे नवीन सरपंचाची निवडणूक होईपर्यंत सरपंचाचे संपूर्ण अधिकार वापर करण्याचे अधिकार उपसरपंचास आपोआपच मिळतात.
त्यानुसार जूनगाव येथील सरपंचाचे पद रिक्त झाल्याने सरपंच पदाचा पदभार उपसरपंच तथा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष राहुल भाऊ पाल यांचे कडे सरपंच पदाचे अधिकार बहाल करण्यात आल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये व नागरिकांमध्ये उत्साह पसरला आहे.



Post a Comment

0 Comments