युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हेमंत बंडूजी आरेकर यांची दुसऱ्यांदा देवाडा बुज. च्या उपसरपंच पदी निवड
अजित गेडाम प्रतिनिधी
जुनगाव: पोंभुर्णा तालुका युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष श्री हेमंत भाऊ बंडूजी आरेकर यांची देवाळा बुज.च्या ग्रामपंचायत उपसरपंच पदी निवड करण्यात आली आहे. या ग्रामपंचायतीत तीन महिन्यापासून उपसरपंच पद रिक्त होते. हेमंत भाऊ आरेकर हेच यापूर्वी उपसरपंच होते परंतु त्यांनी करारानुसार राजीनामा दिला होता. त्यामुळे ही जागा रिक्त होती. या निवडणुकीसाठी काल दिनांक नऊ जानेवारी रोजी तारीख निश्चित केली होती मात्र कोरम अभावी सभा तहकूब झाल्याने सदर पदाची निवडणूक आज दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी घेण्यात आली.
या निवडणुकीकरिता अध्यासी अधिकारी म्हणून अमरदीप खोडके साहेब विस्तार अधिकारी यांनी काम पाहिले, त्यांच्या सहकार्याला ग्रामसेवक प्रमोद सरकार व कर्मचारी उपस्थित होते.
विशेष म्हणजे याच पदावर दुसऱ्यांदा हेमंत भाऊ आरेकर यांचीच निवड झाल्यामुळे त्यांच्या चाहत्यांनी अभिनंदनचा वर्षाव केला आहे.
0 Comments