चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
खेडी गोंडपिपरी महामार्गावरून बेकायदेशीर अवैध वाहतूक करून शेळ्या मेंढ्यांची तस्करी बिन बोभाट सुरू आहे. या व्यवसायात दलाल आणि व्यापारी गब्बर झाले आहेत. त्याचबरोबर संबंधित विभागही मटणाची चव चाखलेले असल्याचे बोलले जात आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्या मधील खेडी ते गोंडपिपरी या महामार्गावरून शेळ्या बकऱ्यांची चोरटी वाहतूक पोलिसांच्या आशीर्वादाने बिन बोभाटपणे सुरू आहे.खेडी जुनासुरला बेंबाळ,नांदगाव आणि इतर भागातून मोठ्या प्रमाणात शेळ्या मेंढ्यांची वाहतूक करून हैदराबाद, तेलंगाना येथे विक्रीसाठी छूप्या मार्गाने नेत असल्याची सर्वांनाच माहिती आहे.
मात्र संबंधित विभाग हे मूग गिळून गप्प बसले आहेत.
शेळ्या मेंढ्यांची तस्करी करणारे व वाहतूक करणारे बनावट कागदपत्र तयार करून चुकीच्या पद्धतीने वाहतूक करतात. अत्यंत क्रूरतेने वागणूक, चारापाणी, पुरेशी हवा व औषध पाणी न देता त्यांचा छळ करत परप्रांतात घेऊन जातात. प्राण्यांचे फिटनेस दाखले व बिले डुप्लिकेट तयार केले जातात.
यांचेवर प्राणी संरक्षण कायद्यानुसार कारवाही करून प्राणी संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.
0 Comments