Ticker

6/recent/ticker-posts

बल्लारपूर विधानसभेत शिवसेनेची मुसंडी, ठिकठिकाणी जोरदार पक्षप्रवेश





उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत पक्षप्रवेश करणाऱ्याची गर्दी :*आंबेधानोरा येथील असंख्य युवा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश*

पोंभूर्णा: शिवसेनेचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरेंनी शिवसंपर्क अभियान सुरू केले आहे त्यास सर्वत्रच उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक तालुक्यात शिवसंपर्क अभियान राबविण्यात येणार असल्याने पोंभुर्णा तालुक्यातील शिवसैनिकांनी प्रत्येक गावात, वार्डात जाऊन युवा वर्गासह जेष्ठ नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन शिवसेनेचे कार्य व विचार पटवून देत आपल्याकडे आकर्षीत करण्यात यशस्वी होत आहेत. तालुक्यातील अनेक गावातील विविध पक्षांचे व सामाजिक कार्यात सक्रिय असणारे कार्यकर्ते स्वेच्छेने शिवसेनेचे सदस्यत्व पत्करत आहेत.


आंबेधानोरा येथील युवा कार्यकर्ते विकास रेगुलवार, वैभव कुणावार,अमित लांडे, निखल बालमवार,रोहित चांमबुलवार, प्रितम रेगुलवार, अनुराग अत्राम, भोजराज रेगुलवार, शिवम मडावी, वेदांत रेगुलवार, विपुल रेगुलवार, राजकुमार गेडाम,विजय अंडगुलवार,साहिल तलांडे,नरेश जुमनाके, संदेश रेंगुलवार,साहिल तलांडे,येश तलांडे, सत्यम मडावी,नयन दुर्वे,सूरज आत्राम,शुभम रेगुलवार,प्रमोद रेगुलवार,गणेश वासेकर व आदी युवक मोठ्या संख्येत शिवसेना जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिर्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना तालुका प्रमुख आशिषभाऊ कावटवार यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश केले.


यावेळी उपतालुका प्रमुख रवींद्र ठेंगणे,नगरसेवक बालाजी मेश्राम, युवासेनेचे महिष श्रिगीरीवार, घनोटी तुकुमचे सरपंच पवन गेडाम, थेरगावचे सरपंच वेदनाथ तोरे,गोकुल तोडासे,उपस्थित होते.





Post a Comment

0 Comments