Ticker

6/recent/ticker-posts

तनसीच्या ठिकाणी आग! मोठा अनर्थ टळला





पोंभुर्णा : शहरातील प्रभाग क्र.१ मध्ये अचानक तणसीच्या ढिगाऱ्याला आग लागली या आगीत तनिस जळून खाक झाल्याची घटना दि.१ फेब्रुवारी ला घडली. तनसीच्या ढिगाऱ्याला आग लागल्याची बातमी शहरात पसरताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी उसळली.

 नगर पंचायतचे अग्निशमक वाहन आग विझविण्याचा प्रयत्न करीत आहे.
वेळीच घटनेची माहिती नगरपंचायतचे नगराध्यक्ष सुलभा गुरुदास पिपरे, मुख्याधिकारी आशिष घोडे, उपाध्यक्ष अजित मंगळगिरीवार, नगरसेवक बालाजी मेश्राम, आशिष कावटवार व कर्मचारी घटनास्थळी हजर झाले होते. साईनाथ तुकाराम मोंगरकर यांची तनिस जळून खाक झाली. त्यामुळे गुरांचे तनिस खाद्याचे नुकसान झाले. त्यामुळे नुकसान भरपाई देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

लगतच्या गोंडपिपरी नगर पंचायतचे वाहनाला पाचारण करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. तनसीचे ढिगारा घराजवळ असल्याने व ढिगाऱ्याला आग लागल्याने गाववासीयांची धावपळ सुरू झाली. आगीचा भडका होवून जवळपास असलेल्या घरांना घेरण्याची पूर्ण शक्यता होती. मात्र अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नाने या आगीवर नियंत्रण ठेवण्यात यश आले आणि शहरवासीयांनी समाधान व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments