Ticker

6/recent/ticker-posts

अल्पावधितच उखडला नांदगाव - गोवर्धन मार्ग


अल्पावधितच उखडला नांदगाव - गोवर्धन मार्ग

पोंभुर्णा : तालुका प्रतिनिधी

खेडी-गोंडपिपरी-पोडसा या मुख्य मार्गाच्या डांबरीकरणाचे बांधकाम कासगतीने व निकृष्ट दर्जाचे केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत असतानाच, नांदगाव ते गोवर्धन दरम्यान ठिकठिकाणी डांबरीकरण उखडले असल्याने, मार्गक्रमण करताना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे.

सदर बांधकाम मागील तीन-चार वर्षांपासून केले जात आहे, परंतु बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे निकृष्ट दर्जाचे बांधकाम केले जात असल्याने, मार्गावरील डांबरीकरण लागलीच उखडत आहे. त्यामुळे नांदगाव-गोवर्धन दरम्यानच्या मार्गावर अप्रत्यक्षरीता गिट्टी अंथरल्याचे दिसत आहे. या मार्गावरील गैरप्रकार दडपण्याकरिता मोठी "डिल" झाल्याची नांदगावात चर्चा आहे.

Post a Comment

0 Comments