पक्षाच्या दुसऱ्या यादीत त्यांच्या नावाची खात्री
दरारा 24 तास
चंद्रपूर: लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची पहिली यादी बुधवारी सायंकाळी जाहीर केली.
या यादीत चंद्रपूर लोकसभेत भारतीय जनता पक्षातर्फे महाराष्ट्रातील हेवीवेट मंत्री श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
भाजपने जाहीर केलेल्या २० उमेदवारांच्या यादीत तेरा विद्यमान खासदारांना पुन्हा संधी देण्यात आलेली आहे. यामध्ये ५ महिला उमेदवार असून ५ खासदारांची तिकिटे कापताना ७ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
लोकसभेसाठी भारतीय जनता पार्टीने मागील पंधरवड्यात १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर भाजपने बुधवारी सायंकाळी दुसरी यादी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील वीस उमेदवारांचा समावेश आहे. यात अपेक्षेप्रमाणे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, कपिल पाटील, डॉक्टर भारती पवार, या विद्यमान मंत्र्यांचा समावेश आहे.
2019 मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री व उत्कृष्ट संसद पटू म्हणून पुरस्कृत हंसराज अहिर यांच्या नावाची चर्चा असतानाच त्यांचा पत्ता कट झाल्याने काही प्रमाणात त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे.
0 Comments