*भाजपची तिकीट सुधीर मुनगंटीवार यांना जाहीर! परंतु कुठेच दिसत नाहीत हंसराज अहिर?*
*काँग्रेसमध्ये उघड गटबाजी, धानोरकर यांच्या बाजूने सर्वत्र वातावरण*
*वडेटीवारांना तिकीट दिल्यास काँग्रेसचे पानिपत! कार्यकर्त्यांचा सूर?*
जिवनदास गेडाम (विशेष प्रतिनिधी)
चंद्रपूर: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रात दररोज नवनवीन ट्विस्ट समोर येत असून ही जागा काँग्रेस आणि भाजप साठी प्रतिष्ठेची ठरली आहे.
भारतीय जनता पक्षाने राज्याचे हेवीवेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना बढती देत भाजपने एक पाऊल पुढे ठेवून सर्वात आधी उमेदवारी जाहीर केली. उमेदवारी जाहीर झाल्यापासून सुधीर मुनगंटीवार हे प्रचार कार्याला लागले. मात्र आतापर्यंत अनेक पत्रकार परिषदा व मेळावे, सभा यामध्ये हंसराज अहिर यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय राहिली आहे. माजी खासदार व विद्यमान ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांना लोकसभेची उमेदवारी मिळेल असा आशावाद भारतीय जनता पक्षाच्या दुसऱ्या खेम्याण्यात असतानाच त्यांना डावलून सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी बहाल करण्यात आली. हंसराज अहिर यांना उत्कृष्ट संसद पटू म्हणून अनेकदार पुरस्कृत करण्यात आले हे येथे उल्लेखनीय.त्यामुळे भाजपमध्ये सुद्धा सर्वकाही अलबेल नाही असे चित्र पाहायला मिळत आहे.
विरोधात प्रबळ दावेदारी असणारा काँग्रेस पक्ष अद्यापही उमेदवार देवू न शकल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्सुकता तथा नाराजी दिसून येत आहे. काँग्रेस कार्यकर्ते दुविधा मनस्थितीत आहेत. मात्र गावागावात प्रतिभा धानोरकर यांनाच उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी महिला वर्गातून व पुरुष गटातून करण्यात येत असल्याचे दिसत आहे. मूल ,पंभूर्णा क्षेत्रातील काही गावात स्वतः महिला पुढे येऊन आमदार प्रतिभा धानोरकर यांनाच तिकीट द्यावी अन्यथा आम्ही पक्षाचे काम करणार नाही असेही बजावले आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी जनमताचा आदर करून आमदार प्रतिभा धानोरकर यांना लोकसभेची उमेदवारी बहाल करावी अशी मागणी जोर धरली आहे.
0 Comments