आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विचार मंथनासाठी पोंभूरणा तालुका काँग्रेसची बैठक संपन्न
पोंभर्णा: आगामी लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून चंद्रपूर आर्णी लोकसभा मतदारसंघासाठी भाजपातर्फे महाराष्ट्राचे वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूर लोकसभा क्षेत्राची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. परंतु काँग्रेस पक्षात उमेदवारीबद्दल वाद सुरू आहे. तरीसुद्धा होळी धुलीवंदनाच्या पर्वावर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती रवींद्र मरपल्लीवार तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विनोद भाऊ अहिरकर यांच्या उपस्थितीत तालुका काँग्रेस कमिटीची बैठक काँग्रेस नेते अशोक गेडाम यांच्या निवासस्थानी आज पार पडली.
याप्रसंगी माजी नगरसेवक जयपाल गेडाम, धम्मा निमगडे, नीलकंठ नैताम,बाजार समिती संचालक विनोद थेरे, सरपंच भालचंद्र बोधलकर,यांच्यासह तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी विनोद अहिरकर यांनी कार्यकर्त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीबद्दल माहिती दिली. व काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी जिद्दीने आम्हाला लागावे, काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी विनोद अहिरकर यांनी केले .
श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांना उमेदवारी मिळाल्यास निश्चितच निवडून येतील असा आत्मविश्वास विनोद अहिरकर यांनी बोलून दाखवलेला आहे. अनेक कार्य प्रतिभाताईच्या माध्यमातून तसेच स्वर्गीय बाळूभाऊ धानोरकर यांच्या माध्यमातून झालेले आहेत. काँग्रेस पक्ष कुठेही कमी नाही, आपण सर्वांनी तालुक्यातील प्रत्येक गावागावात आपापल्या पद्धतीने प्रचार करून प्रतिभाताईंना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन बाजार समितीचे सभापती तथा तालुका अध्यक्ष माननीय रवी मरपलीवार यांनी केले आहे.
0 Comments