काँग्रेस कार्यकर्त्यांनो कामाला लागा! विजय आपलाच-विनोद अहिरकरांचे आवाहन
चंद्रपूर: राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे देशात बळकट होत चाललेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहात भर पडली असून चंद्रपूर लोकसभेची उमेदवारी आमदार प्रतिभा धानोरकर यांना मिळाल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. हा उत्साह कायम ठेवत कार्यकर्त्यांनी कामाला लागावे विजय आपलाच आहे असे आवाहन काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष विनोद अहिरकर यांनी केले आहे.
चंद्रपूर लोकसभा तिकिटाचा तिढा काल सुटल्यानंतर आमदार प्रतिभा धानोरकर यांना पक्षाने उमेदवारी बहाल केली आहे. त्यांच्या विजयासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने हिरहिरीने कामाला लागावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading