Ticker

6/recent/ticker-posts

चंद्रपूर लोकसभेसाठी काँग्रेसमध्ये वाद सुरू? दोघांच्या वादात तिसऱ्याचा लाभ होणार काय!


चंद्रपूर लोकसभेसाठी काँग्रेसमध्ये वाद सुरू? दोघांच्या वादात तिसऱ्याचा लाभ होणार काय!

जीवनदास गेडाम,
   चंद्रपूर लोकसभेसाठी भारतीय जनता पक्षाने सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली आहे. परंतु काँग्रेस पक्षाने मात्र अद्यापही उमेदवार जाहीर न केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
महाविकास आघाडीच्या युतीत चंद्रपूर लोकसभा क्षेत्र काँग्रेसच्या वाट्याला आलेला आहे. त्यामुळे येथून कोणाला उमेदवारी दिली जाणार याची उत्सुकता असतानाच काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. उमेदवारीसाठी दोन महिला नेत्यांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी यांनी काँग्रेसकडे तिकीट मागितले आहे. या मतदारसंघातून निवडून आलेले स्वर्गीय बाळू धामोडकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनी आपल्यालाच उमेदवारी मिळणार असा दावा केला आहे. तुल्यबळ उमेदवार म्हणून प्रतिभा धानोरकरच होऊ शकतात, त्यांची उमेदवारी पक्षाला विजय मिळवून देणारी ठरेल. त्यामुळे पक्षाने प्रतिभा धानोरकर यांनाच तिकीट द्यावी अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून होताना दिसत आहे.



Post a Comment

0 Comments