Ticker

6/recent/ticker-posts

नांदगाव चे उपसरपंच सागर देऊरकर यांचा भाजपात प्रवेश-माजी सरपंच मंगेश मग्नुरवार यांचे मोलाचे योगदान


नांदगाव चे उपसरपंच सागर देऊरकर यांचा भाजपात प्रवेश-माजी सरपंच मंगेश मग्नुरवार यांचे मोलाचे योगदान

मुल: तालुक्यातील प्रतिष्ठित बाजारपेठ असलेल्या व राजकीय दृष्ट्या अति संवेदनशील असलेल्या नांदगाव येथील उपसरपंच सागर देऊळकर यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला आहे.


नांदगाव बिंबड विभागातील ओबीसी समाजाचे नेतृत्व करणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची परिसरात ओळख आहे. काँग्रेस पक्षात ग्रामपंचायतच्या बाबतीत विकास कामे होत नसल्यामुळे त्यांनी कंटाळून जाऊन भारतीय जनता पक्षाचे लोकसभा उमेदवार व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विकास कामांचा झंजावात बघून ते प्रभावित झाले व त्यांच्या वर विश्वास दाखवत त्यांनी त्यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला.
यावेळी भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी चंदू मार्गोनवार, माजी सरपंच मंगेश मगनुरवार, माजी सरपंच प्रशांत बांबोडे, उपस्थित होते. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना बळ मिळेल असे बोलल्या जात आहे.

Post a Comment

0 Comments