विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर : पोंभुर्णा तालुक्यातील घोसरी येथील रागिट यांच्या देशी दारू दुकानातून बनावटी दारू बाहेर अवैधरित्या विकली जात आहे. ओरिजनल दारू भट्टीतून चिल्लर विक्रीसाठी ठेवली जाते आणि त्या नावावर बनावटी देशी दारू मोठ्या प्रमाणात बाहेर अवैधरीत्या विकली जाते. या देशी दारूच्या दुकानाची राज्य उत्पादन शुल्क विभागाने व संबंधित पोलीस विभागाने सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष विनोद अहिरकर यांनी केली आहे.
मुल पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या या देशी दारूच्या दुकानात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुरू असल्याचा आरोपही अहिरकरांनी केला आहे.
सदर दारू दुकान आमरस्त्यावर व वर्दळीच्या ठिकाणी असल्यामुळे नागरिकांना विशेष करून महिलांना त्रास होत आहे. दुकानातून चिल्लर विक्री केवळ 20 पेट्या दारूच विकली जाते. परंतु रोजच्या सेलिंग मध्ये पन्नास पेट्या दाखवल्या जातात. मग उर्वरित तीस पेट्या कुठे जातात याचा तपास पोलीस विभाग मुल, राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी करावा असे अहीरकर म्हणाले. उर्वरित तीस पेट्या दारू अवैध मार्गाने गडचिरोली जिल्ह्यातील खेड्यापाड्यात विकली जाते. एक नंबरचा माल दुकानात ठेवल्या जाते आणि दोन नंबरचा बनावटी माल हा बाहेर अवैधरीतल्या विकल्या जातो.
दुकान चालकावर अनेकदा गुन्हे दाखल झाले आहेत त्यांचा तपास केल्यास अवैध कारभार उघड होईल.
निवडणूक काळात दुकान बंद असतात त्यावेळेस मात्र 300 ते 400 देशी दारूच्या पेट्या बाहेर काढल्या जातात. दुकानाला सील लावले असले तरी वेगळी शक्कल लढवून माल बाहेर काढल्या जातो. या कालखंडात दुकानाला सील करत असताना गावातील पंचाला उपस्थित ठेवून सिल करावे आणि दुकानात असलेल्या मालाची गिनती करावी. अन्यथा मोठ्या प्रमाणात गैर मार्गाने दारू बाहेर येऊन याचा गंभीर परिणाम निवडणुकीवर होणार, त्यामुळे निवडणूक आयोगाने सुद्धा याची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे.
भाजपचे लोकसभा उमेदवार दारूवाल्यांना हाताशी धरून दारू वाटून व पाजून निवडणूक जिंकण्याच्या तयारीत आहेत, परंतु त्यांचे मनसुबे हे धाराशाही पडणार आहेत. असेही विनोद अहिरकर यांनी म्हटले आहे.
ते स्वतः राज्य उत्पादन शुल्क विभाग, जिल्हाधिकारी, पोलीस विभाग यांना तक्रार देऊन दुकानाची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचेही अहिरकर यांनी स्पष्ट केले.
0 Comments