विज पडून गाय मृत्युमुखी, सरपंच भालचंद्र बोधनकर यांची माहिती
पोंभुर्णा प्रतिनिधी
तालुक्यातील जाम तुकुम येथे रविवारी रात्री बारा वाजताच्या सुमारास अवकाळी पाऊस व वादळ वारा झाला. यात विज पडून एक गाय दगावल्याचे घटना तालुक्यातील जामतुकुम येथे उघडकीस आली. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या गाईच्या मालकाचे नाव बालाजी सोनुजी राऊत असे असल्याचे समजते.
सदर घटनेची माहिती सरपंच भालचंद्र बोधनकर यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली असता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा फोन लागला नाही. त्यामुळे रात्री उशिरा मृत्यूमुखी पडलेली गाय सोमवारी सुद्धा गाईचा मृतदेह तसाच पडून होता. सदर बाब सरपंच बोधलकर यांना माहिती होताच त्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी खोब्रागडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा भ्रमणध्वनी संपर्क क्षेत्राच्या बाहेर सांगत होता.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या नाना प्रकारच्या नुकसानी होत आहेत. प्रशासन मात्र अवकाळी पावसात कुठलीच मदत देता येत नाही. असे सांगून शेतकरी, कष्टकरी, मजूर वर्गांना वेठीस धरत असल्याचे नागरिक बोलून दाखवत आहेत.
0 Comments