कुर्हाडीने वार करून पत्नीचे मुंडके केले धडावेगळे: गडचिरोली जिल्ह्यातील थरकाप उडवणारी घटना
कोरची:-मुख्यालयापासून 10 किमि अंतरावर असलेल्या बेतकाठी येथे रात्री 3 वाजताच्या दरम्यान पत्नी आणि 5 वर्षाची मुलगी झोपेत असताना पती रोहिदास बंजार याने आपल्या पत्नीच्या गळ्यावर कुर्हाडीने 3 वेळा वार करून धडावेगळे केले.ही सर्व घटना 5 वर्षाची मुलगी बघत असताना तिला सुद्धा धमकावल्याची माहिती असून आरोपी रोहिदास राऊत याला पोलिसांनी अटक केली आहे. अमरोतीन बंजार (33) असे मृतक महिलेचे नाव आहे.
अमरोतीन बंजार आणि रोहिदास बंजार यांचे 2009 ला लग्न झाले व त्यांना 4 मुली आहेत. नवव्या वर्गात असलेली सर्वात मोठी मुलगी ही घटनेवेळी छत्तीसगडला आपल्या मामाच्या गावी गेली होती. दोन मधल्या मुलीही आपल्या आजीकडे झोपून होत्या तर लहान मुलगी आरोपी रोहिदास व आपल्या आईसोबत झोपून होती. आरोपी रोहिदास हा आपल्या पत्नीला मारझोड करतो म्हणून 4 वर्षापूर्वी बेतकाठी येथे बैठक घेऊन त्याची समझूत काढण्यात आली होती. मात्र कुठला तरी राग मनात धरून त्या नराधमाने आपल्या पत्नीला लहानशा चिमुकलीसमोर क्रूरपणे संपवून टाकल्यामुळे या 4 मुलींचे आईचे छत्र छाया हरपले आहे.
घटनेनंतर आरोपी रोहिदास यांनी आपली कुर्हाड लपविली होती. ती कुर्हाड कुठे लपविली ती त्या लहान चिमुकलीने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी आरोपी रोहिदास यास अटक केली असून पुढील तपास पोलिस स्टेशन कोरचीचे प्रभारी अधिकारी वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
काही महिन्यापूर्वी आरोपी हा बोअरचे काम करण्याकरिता दुसर्या जिल्ह्यात गेला होता. तिथ त्याने आपल्याच मालकाला सुद्धा मारहाण केल्याची चर्चा आहे.
0 Comments