Ticker

6/recent/ticker-posts

*गोवरी सेंट्रल कोळसा प्रकल्पा चा मार्ग मोकळा* 👍 *कामगार नेते बबन उरकुडे यांच्या अथक प्रयत्नांना यश*

*गोवरी सेंट्रल कोळसा प्रकल्पा चा मार्ग मोकळा*


*कामगार नेते बबन उरकुडे यांच्या अथक प्रयत्नांना यश*


चंद्रपूर:-गोवरी सेंट्रल कोयला प्रकल्पाच्या सेकशन चा मार्ग मोकळा झाला असून कोळसा खरेदी करारनाम्यावर शिक्का मोर्तब झाला आहे.
कामगार नेते बबन उरकुडे यांच्या नेतृत्वात मागील वर्षभरापासून या प्रकल्पसाठी पाठवपुरावा आणि आंदोलणे केली होती डिसेंबर 2023 मध्ये गोवरी, गोयेगाव, माथरा, मूठरा येथील असंख्य प्रकल्पग्रस्थानी एकत्र येत गोयेगाव साईडिंग येथील मुख्य रस्ता अडवून धरत 2 तास काम बंद आंदोलन पुकारले होते.
कामगार नेते बबन उरुकडे यांच्या पुढाकाराने आणि एच एम एस नेते शिवभैय्या यादव यांच्या नेतृत्वात मागील महिन्यात सी एम डी कार्यालय नागपूर येथे बैठक लावून या प्रकल्पाला फायनल ऍग्रीमेन्ट साठी ग्रीन सिग्नल देण्यात आला होता.
याचीच प्रचिती म्हणून या प्रकल्पच्या कोळसा खरेदी विक्रीचा करारनामा आता पूर्ण झाला असून शेतकरी प्रकल्पधारकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.


या प्रकल्पाच्या प्रगतीसाठी स्वतःचे कुठलेही कष्ट नसताना परिसरातील काही स्वयंगोषित कामगार पुढऱ्यांनी आणि त्यांच्या जिल्ह्यातील नेत्यांनी तीन वर्षापूर्वी चा अंतरगाव मधील शेतकर्यांनी दिलेल्या निवेदन चा सहारा घेत श्रेय लाटण्याचा लाजीरवाणा प्रयतन केले आहे. त्यांनीं कधी रस्त्यांवर उतरून आंदोलन केले काय? त्यांनीं कधी कधी कंपनी प्रशासन कडून लिखित आश्र्वासन घेतले होतें काय? ज्या प्रकारे आंदोलना दरम्यान प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन बबन भाऊ नि सी. जी .एम. डे साहेबांकडून तिन महिन्याच्या आत कोयला खरेदी विक्री चा करारनामा करून शेक्सन4 करीता पाटवण्यात येईल असे लिखित घेतले होतें काय? तिन महिने उलटून सुध्दा करारनामा न झाल्यामुळे रस्त्यांवर उतरुन संघर्ष पुन्हा केला काय? ज्या प्रमाणे बबन भाऊ नी पुन्हा रस्त्यांवर उतरुन कंपनी प्रशासनाला धारेवर धरत कोल इंडिया टॉप मोस्ट एच एम एस युनियन लिडिर श्री शिवकुमार यादव यांच्या मद्दततीने वे. को.ली सी. एम. डी .द्रिवेदी साहेबा सोबत ह्या सर्व समस्यांवर तोडगा काडण्याकरीता प्रकल्प ग्रस्तांना घेऊन मिटीग केल्या काय असा प्रश्नन आज सर्व सामान्य जनता व प्रकल्पग्रस्त शेतकरी करत आहेत.

परंतु परिसरातील नागरिक व प्रकल्पग्रस्त शेतकरयांना घेऊन रस्त्यावर उतरून लढणाऱ्या बबन भाऊला नाही विसरणार म्हणत संपूर्ण प्रकल्पधारकांनी एच एम एस संघटनेच्या व सम्पूर्ण शिवसेना ( ऊ बा.ठा)पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments