Ticker

6/recent/ticker-posts

खंडित वीजपुरवठा तत्काळ सुरू करावा : इंजिनीयर वैभव पिंपळशेंडे


खंडित वीजपुरवठा तत्काळ सुरू करावा : इंजिनीयर वैभव पिंपळशेंडे

पोंभुर्णा : नवेगाव मोरे,दिघोरी शेतशिवारातील विद्युत पुरवठा करणारे उभे खांब पाडून चोरट्यांनी खांबावरील तार चोरून नेले आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या शेतात होणारा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. तो पूर्ववत सुरू करण्यात यावा, खरीप हंगामातील पेरणी पूर्व शेतीचे कामे सुरू झाले आहेत. सद्यस्थितीत उन्हाचा कडाका कायम आहे. शेतीतील पिके वाचवण्यासाठी पाण्याची आवश्यकता लागतो त्यामुळे विद्युतची आवश्यकता आहे. त्यामुळे खंडित विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात यावा अशी मागणी चेक ठाणेवासणा ग्रामपंचायत सदस्य इंजिनीयर वैभव पिंपळशेंडे यांनी केली आहे. 

मागील वर्षी १० जून रोजी आलेल्या चक्रीवादळात कोलमडून पडलेले खांब अजूनही उभे करण्यात आलेले नाहीत. चेक ठाणेवासना येथील कामीडवार यांच्या शेतांत 63 केव्हीए या ट्रान्सफॉर्मरऐवजी १०० केव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसवून मिळावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे. 

नवेगांव मोरे, दिघोरी शेतशिवारातील अनेक विद्युत खांब पाहून चोरट्यांनी तारा लंपास केल्या, परिणामी शेतकऱ्यांच्या शेतातील होणारा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. परंतु, महावितरण कंपनीने अजूनपर्यंत ते खांब उभे करून विद्युत पुरवठा सुरू केलेला नाही. त्यामुळे अनेक शेतकरी आतापासूनच पासूनच चिंताग्रस्त झाले आहेत, चेकठाणेवासना, चेक खापरी परिसरात मागील वर्षी १० जून रोजी झालेल्या चक्रीवादळात शेतशिवारातील व
===================
नवेगाव मोरे, चेक ठाणेवासणा परिसरातील तुटलेले, खांबाची व ट्रान्सफॉर्मरची मागणी केली असून दोन-चार दिवसांत खांब व ट्रान्सफॉर्मर उपलब्ध होणार आहे लवकरच विद्युत पुरवठा पूर्ववत होईल.👇

-मंगेश येनुरकर, उपविभागीय कार्यकारी अभियंता, पोंभूर्णा
================.===
गावातील अनेक खांब कोलमडून पडले होते. एक वर्षाचा कालावधी लोटत चालला असूनही अजूनपर्यंत खांब उभे केलेले नाहीत. त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. शिवाय राकेश कामीडवार यांच्या शेतातील कमी क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बदलून तो १०० केव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसवून देण्यात यावा अशी मागणी चेक ठाणेवासणा, ग्रामपंचायत सदस्य इंजिनीयर वैभव पिंपळशेंडे यांनी निवेदनातून केली आहे.

Post a Comment

0 Comments