लोकसभा निवडणूक संपली, आता विधानसभेच्या तयारीला लागा: विनोद अहिरकर यांच्या कार्यकर्त्यांना सूचना.....
जिवनदास गेडाम/ विजय जाधव, प्रतिनिधी
चंद्रपूर:-लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने घवघवीत यश संपादन करत पुनरागमन केले आहे. काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणाच्या बाजूने भारतीय जनतेने कौल दिलेला आहे.
या यशामुळे सर्वत्र काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण आहे. महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यात काँग्रेस पक्षाची ताकद वाढलेली आहे. हे लोकसभा निवडणुकीच्या मतदानावरून सर्वांनाच कळायला आलेलं आहे.
याच पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित करण्याचे काम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी सेलचे उपाध्यक्ष विनोद अहिरकर यांनी केलेला आहे. निवडणुकीचे निकाल जाहीर होताच सरकार कोणाचेही बसो हे देणे घेणे न ठेवता पोंभुर्णा तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या बैठका सुरू झाल्या आहेत. त्याचाच प्रत्यय तालुक्यात विनोद अहिरकरांच्या बैठकांमुळे येत आहे.दिनांक 9 जून रोजी चिंतलधाबा या गावात जगन्नाथ मठ येथे काँग्रेस पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पक्षाचे ओबीसी सेलचे उपाध्यक्ष, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विनोद अहिरकर हे उपस्थित होते. त्यांनी या निमित्ताने गावातील व परिसरातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की लोकसभा निवडणूक संपली आहे. लोकसभेचा निवडणूक निकाल आपल्या बाजूने लागलेला आहे. आपल्या समस्यांचे निराकरण करण्याकरिता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला भरभरून आशीर्वाद द्यावा असे आवाहन कार्यकर्त्यांना केले.
कार्यकर्त्यांनी सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अनेक पक्षांचे उमेदवार उभे ठाकणार आहेत. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर बिळातून बाहेर निघणाऱ्या सापांना त्यांचे बीड दाखवून द्यावे असे आवाहन सुद्धा अहिरकरांनी केले.
या बैठकीत चंद्रपूर आर्णी लोकसभा क्षेत्रातील काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांना खासदार म्हणून भरघोस मतांनी निवडून दिल्याबद्दल अहीरकरांनी मतदारांचे व कार्यकर्त्यांचे आभार मानले.
याप्रसंगी चिंतलधबा जिल्हा परिषद क्षेत्रातील केमारा, आंबे धानोरा,भटाळी, देवई, चेक बल्लारपूर,चेक आष्टा, सोनापूर ,खरमत, आष्टा येथील प्रत्येकी पाच कार्यकर्ते सभेला उपस्थित होते.
0 Comments