कोरंबी परिसरात वाघाचा वावर। जेसीबी मशीन च्या सभोवताल वाघाची प्रदक्षिणा! जेसीबी ऑपरेटरची उडाली घाबरगुंडी...
प्रतिनिधी... जूनगाव: मुल तालुक्यातील कोरंबी (नवेगाव भुजला) परिसरात शेत शिवारात वाघाचा वावर असून भीतीपोटी नागरिकांनी शेतावर जाणे टाळले आहे. रात्रीच्या सुमारास जेसीबी चालू असताना मशीनच्या सभोवतालून या वाघाने प्रदक्षिणा घातली. त्यामुळे जेसीबी ऑपरेटर पार घाबरून गेला आणि त्याने आपल्या केबिनचे सर्व दरवाजे व काच बंद करून तिथून पळ काढला. वनविभागाने वेळीच या वाघाला जेरबंद करावे अशी मागणी शेतकरी नागरिकांनी केली आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading