दरारा 24 तास
पोंभुर्णा : दि.17/6/2024 रोजी दिघोरी येथे काँग्रेस कार्यकर्त्याची बैठक पार पडली. सदर बैठकीला कृषी बाजार समितीचे संचालक श्री. वसंत पोटे, तालुका ओबीसी सेलचे अध्यक्ष अमित जी पाल, मीडिया सेल बल्लारशा विधानसभा अध्यक्ष प्रशांत झाडे, यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. नुकताच झालेल्या चंद्रपूर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुधीर मुनगंटीवार यांचा दोन लाख साठ हजार मतांनी दारुण पराभव श्रीमती प्रतिभा धानोरकर काँग्रेसचे उमेदवार यांनी केला.
या सर्व निवडणुकीत व पूर्ण पोंभूर्णा तालुक्यातील भरपूर मताधिक्य मिळून दिल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांचे जाहीर आभार विनोद अहिरकर यांनी मानले. त्याचबरोबर येत्या काळात महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका होऊ घातली असून त्यामध्ये 72 बल्लारपूर विधानसभेसाठी विधानसभेसाठी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी कामाला लागावे अशा सूचना कार्यकर्त्यांना विनोद भाऊ अहिरकर यांनी दिल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सभा घेण्यात आली, सभेला तालुका अध्यक्ष ओबीसी सेल अमित पाल, बाजार, समिती संचालक, वसंत पाटील पोटे, सोसिअल मीडिया अध्यक्ष, प्रशांत झाडे, नंदू कुमरे, कर्नू काळे,व परीसरातील काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments