प्रतिभा धानोरकरांच्या विजयाचा जूनगावात उत्साह : फटाके व गुलाल उधळून साजरा केला विजयोत्सव
चंद्रपूर: लोकसभा निवडणुकीचा निकाल नुकताच लागला असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार प्रतिभाताई धानोरकर या चंद्रपूर लोकसभेतून भारी बहुमताने विजय झाल्या आहेत. अर्थात निकाल जाहीर होणे बाकी आहे.
सुधीर मुनगंटीवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा तालुका सुद्धा त्यांना खूप काही साथ देऊ शकला नाही. जूनगावात सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा दबदबा होता.मात्र या निवडणुकीत प्रतिभा धानोरकरांनी त्यांच्या धबधब्यावर मात करत येथूनही आघाडी घेतली होती.
आज सायंकाळी निकाल जाहीर होण्याच्या आधीच प्रतिभाताई धानोरकर यांना अडीच लाखाची लीड मिळाली असल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गावात जल्लोष साजरा केला. यात काँग्रेसचेच कार्यकर्ते नव्हते तर महाविकास आघाडीचे घटक पक्ष शिवसेना व इतर पक्षाचे ही कार्यकर्ते हिरहिरीने सहभागी झाले होते. गावातील चौका चौकात फटाके फोडून कार्यकर्त्यांनी उत्साह साजरा केला.
0 Comments