Ticker

6/recent/ticker-posts

अल्पशा पावसानेच नांदगाव बस स्थानक परिसरात साचले पाण्याचे डबके: मुख्य प्रवेश द्वार करत आहेत भरलेल्या डबक्यातून स्वागत


अल्पशा पावसानेच नांदगाव बस स्थानक परिसरात साचले पाण्याचे डबके: मुख्य प्रवेश द्वार करत आहेत भरलेल्या डबक्यातून स्वागत

चंद्रपूर विशेष प्रतिनिधी: बुधवारी झालेल्या पावसामुळे मुल तालुक्यातील नांदगाव बस स्थानक परिसर पाण्याच्या डबक्यामध्ये तब्दील झाले आहे. परिणामी प्रवाशांना व नागरिकांना डबक्यातील पाण्यामधून ये जा करावी लागत आहे. उन्हाळ्यात नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत होता आता पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गाने बस स्थानकावरूनच सुरजागड प्रकल्पाच्या जड वाहनांमुळे नागरिकांचे धुडीने हाल झाले. आता पावसाने पावसाळाभर नागरिकांचे कोणते हाल होतील हे सांगता येणे कठीण आहे. 


कारण येथील राजकारणी पुढारी हेवे दावे करण्यात मश्गुल आहेत. त्यामुळे म्हणावा तसा नांदगाव या गावाचा भौगोलिक विकास झालेला नाही. दोन्ही राष्ट्रीय पक्षाचे मोठमोठे पुढारी या गावात वास्तव्यास असून त्यांनी जर ठरवले तर नांदगाव चा कायापालट होऊ शकते परंतु या सर्व राजकारणी, पुढारींना हेवेदावे झुगारून गावच्या विकासासाठी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे.

दरवर्षी नांदगाव बस स्थानक परिसरात हीच अवस्था बघायला मिळत असते. यावेळेस तरी संबंधितांनी लक्ष देऊन सार्वजनिक बांधकाम विभाग यांना कळवून किंवा स्वतः पुढाकार घेऊन जे शक्य होईल ते करावे आणि या डबक्यातून नागरिकांची मुक्तता करावी अशी मागणी प्रवासी तथा नांदगाव वासिया नागरिकांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments