Ticker

6/recent/ticker-posts

तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्या। सरपंच संघटनेचे अध्यक्ष भालचंद्र बोधलकर यांची मागणी।



  • तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्या। सरपंच संघटनेचे अध्यक्ष भालचंद्र बोधलकर यांची मागणी।


  • पोंभुर्णा: संततधार अतिवृष्टीमुळे तालुक्यात अनेक गावात पुराचे पाणी शिरले. या पुरामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे व पडझडीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना ताबडतोब आर्थिक मदत करावी अशी मागणी सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष भालचंद्र बोधनकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

  • संपूर्ण विदर्भात मुसळधार पाऊस झाल्याने सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली. तालुक्यातील अनेक गावात तील शेतकऱ्यांचे धान सोयाबीन तूर व इतर पिके बुडून नष्ट झाली आहेत. मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरांची पडझड झाली आहे. अनेकांना निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. या सर्व बाबींवर प्रशासनाने गांभीर्याने लक्ष केंद्रित करून गरजूंना तात्काळ मदत करावी अशी मागणी जामतुकुम चे सरपंच आणि सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष भालचंद्र बोधलकर यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments