दरारा 24 तास
पोंभुर्णा:गेले दोन दिवसांपासून विदर्भात धुव्वाधार पाऊस कोसळत आहे. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांत अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळित झाले आहे.
पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने सर्वच नद्यांचे पाणी वाढू लागले आहे. पोंभुर्णा, मुल, गोंडपिपरी , सावली तालुक्यांत अतिवृष्टी तर इतर ठिकाणी जोरदार पावसाने झोडपून काढल्याचे वृत्त आहे.
0 Comments